- Are you a weigh Scale Slave ?
- Exercise is a magic pill
- Today is my tomorrow !
- Exercise and Brain Power
- मधूमेह व व्यायाम
- Diabetes and exercise
- Rajmachi Trek and Fitness Markers !
- Overeating woes !
- जैविक वय / कालिक वय
- Biological Age / Chronological Age
- रिकाम्या घरट्याची व्यथा….
- Empty Nest Syndrome
- Ragi or Nachni Benefits
- नाचणी चे फायदे
- Functional Training and Its Benefits
Ragi …
Ragi or Nachni is one of the millets may be a cheapest carbohydrate and protein source but very rich nutritionally !
Ragi is a very good source for all these
Calcium.. it keep bones strong and healthy ..
Iron .. maintains haemoglobin and helps to prevent Anaemia
It provides other minerals like potassium and phosphorus which help mainly in maintaining the liquid balance .
It is very helpful in keeping away Bad cholesterol thus preventing cardiac problems.
Its high fibre content makes it a very good diatery alternative in diabetes management.
So looking at all these benefits now you surely know that it should be a part of regular diet . One can have nachni in many different forms.. make a porridge or a bhakri . We have nachni Aambil ( its a goan nachni porridge) absolutely every morning.. sometimes i add it to Thalipeeth or even to cake batter …
Nachni is nutritionally so rich that regular use of nachni will benefit everyone right from babies to older people !
माझ्या लग्नानंतर मी प्रथमच दिवसाची सुरवात नाचणीची पेज किंवा आंबिल घेऊन होताना पहात होते, ( हा एक गोव्यातील पदार्थ आहे .. माझ्या सासूबाई तिथल्या असल्याने हा पदार्थ आमच्याकडे होत असे व शिवाय त्याही आहारातबाबत फारच माहीतगार असल्याने त्या सहाजिकच रोजच्या आहारात त्याचा वापर करत असत ).बरेच तास आंबवल्याने त्याची पौष्टीकता तर वाढतेच शिवाय एक विशिष्ठ स्वादही येतो. मलाही सुरवातीला ती चव जरा आवडत नसे मात्र रोज प्यायल्याने ते आंबिल आवडायला लागले .
नंतर मात्र फ़िट्नेस व नूट्रिशन शिकताना त्याचे फायदे लक्षात आले व आमच्या रोजच्या नाश्त्याचा एक अविभाज्य घटक होऊन गेले.
नाचणी हा एक अतिशय स्वस्त कार्बोहाइड्रेट व प्रोटीन स्रोत आहे. मात्र पौष्टीकतेच्या द्रृष्टीने फारच लाभदायी आहे. नाचणी हे अनेक फायदे होतात…
कैल्शीयम – हे मोठ्या मात्रेत असल्याने अर्थातच हाडे मजबूत होतात .
आयर्न – रक्तातील हीमग्लोबिन चे प्रमान सूधारते व अनिमिया होत नाही.
फॉसफोरस व पोटँशियम -ही शरीरातील लिक्विड बँलन्स सांभालतात.
नाचणीतील अँटी ऑक्सिडंट ने वार्धक्य दूर रहाते.
त्यातील पॉलीफ़ेनोल्स नी रक्तातील शर्करेची मात्रा व्यवस्थित रहाते.
ट्राइग्लिसरायड कमी करते तसेच LDL कलेस्टरॉल कमी करते.
आता हे सर्व फायदे पहाता नाचणी ची पौष्टीकता तुमच्या लक्षात आली असेलच . रोजच्या आहारात पेज, भाकरी, नाचणीचे थालीपिठ अशा अनेक प्रकारे नाचणी सेवन करता येईल. अगदी तान्ह्या बालापासून वयोवृद्ध अशा सर्वांसाठी आहारात नाचणीचा नियमीत वापर अत्यंत गरजेचा आहे.