Exeryogi's blog
All about 30s to 50s
Recent Comments
Subscribe via Email

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Posts in the ‘मराठी’ Category

मधूमेही व्यक्तींकरीता नियमित व्यायाम हा अतिशय उपयुक्त ठरतो. मधूमेह आहे म्हणून घाबरून न जाता योग्य खबरदारी घेतली तर रक्तातील अनियंत्रित साखर फार प्रभावीपणे नियंत्रणात आणता येते.
याचे कारण म्हणजे आपण व्यायाम करतो तेव्हा आपले स्नायू रक्तातील साखरेचा उपयोग इंधनासारखा करतात म्हणजे आपोआपच रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होते. लठ्ठपणा कमी होतो. शरीर बांधेसूद होते, अशक्तपणा कमी होतो,HDL कलेस्टरोल वाढते व LDL कलेस्टरोल कमी होते . याचा मुख्य फायदा म्हणजे मधूमेहीना असलेला ह्रदयरोगाचा धोका फार कमी होतो. व्यायामाचे हे इतर फायदे अर्थातच मधूमेही व्यक्तीचे जीवनमान सुधारण्यास मदत करतात.
व्यायाम प्रथमच सूरू करत असाल तर सर्वात प्रथम Diabetologist कडून व्यायाम, आहार , औषधे व त्यांच्या वेळा यांचा एकत्र समावेष असलेला तक्ता बनवून घ्यावा व त्यानूसारच त्याचे पालनही करावे .
त्याची माहिती आपल्या ट्रेनरलाही द्यावी .
अचानक रक्तातील साखर कमी झाली तर पटकन तोंडात टाकण्यासाठी नेहमी खिशात गोड पदार्थ असावा.
पायांची नियमित तपासणी करावी व योग्य ती
काळजी घ्यावी.
प्रथमच व्यायामाची सूरवात करत असाल तर हलका व्यायाम करावा व हळूहळू त्यात बदल करून जास्त वेळ पर्यंत वाढवावा.
या सर्व गोष्टी लक्षात ठेवल्या तर रक्तातील अनियंत्रीत साखर नियंत्रीत करणे शक्य आहे व औषधांची मात्राही कमी होऊ शकते.

कालिक वय म्हणजे अर्थातच तुमचे जन्मापासूनचे वय पण तुमच्या शरीराचे व अवयवांचे वय किंवा त्यांची स्थिती म्हणजे तुमचे जैविक वय.
हे त्या कालिक वयाच्या मापदंडानूसार असावे पण आपल्या दिनचर्येने व राहणीमानाने त्यात फार मोठी तफावतही येते.म्हणजे जर तुमची दिनचर्या तणावपूर्ण असेल , योग्य आहार व व्यायाम तुम्ही करत नसाल ,पूर्ण झोप घेत नसाल किंवा काही व्यसन असेल तर या सर्व गोष्टींचा विपरीत परिणाम नक्की शरीरावर दिसायला लागतो .अकालीच वृध्दापकाळाची चिन्हे दिसायला लागतात . अवयवांची व शरीराची अवस्था कालिक वयाच्या मापदंडांवर जास्त दिसायला लागते . चेहरा , बांधा, शरीराची स्थिती यावरूनही तूम्ही वयापेक्षा मोठे असता व दिसायलाही लागता. उदाहरणच द्यायचं झालं तर जरी तुम्ही कालिक वयाने ४५ वर्षांचे असाल तरीही तुमचे जैविक वय ५०ते ६० वर्ष असू शकते.
शरीराचे वय जेव्हा असे जास्त दिसते व तुमचे शरीरही वेगवेगळ्या व्याधींनी अकालीच पोखरलेले दिसते तेव्हा नक्कीच एक धोक्याची घंटा वाजली पाहीजे.
अनेक Body Analysers किंवा Biological Age tests नी आपल्याला आपले जैविक वय हे कालिक वयापेक्षा कमी किंवा निदान तेवढेच आहे का ते तपासता येते.
ते तसे येण्याकरता नियमित व्यायाम, योग्य आहार, पूरेशी झोप व सकारात्मक वृत्ति हीच गुरूकिल्ली आहे. वाढदिवस साजरा करताना जरा जैविक वयाकडेही नक्की लक्ष ठेवा.

IMG_6873

रिकाम्या घरट्याची व्यथा….
Empty Nest Syndrome म्हणजे शिकण्या करीता मूलं घर सोडून बाहेर पडतात तेव्हा होते ती भावनिक उलाघाल !
माझ्या आयुष्यात अचानक ही उलथापालथ झाली . हे असं होतं हे ऐकलं व वाचलं होतं मात्र खरच हे झालं तेव्हा मी या सगळ्याला मानसिकरित्या अजिबात तयार नव्हते.
आत्तापर्यंत मी दोन्ही मुलींचे रूटीन बघूनच माझे फीटनेस चे क्लासेस करत होते. माझा अख्खा दिवस त्यांच्याबरोबर शाळा व क्लास ना जात , त्यांच्यासाठी न्यूट्रीशस डबा , नाष्ता व जेवण करत , शाळेनंतरच्या गप्पा ऐकत ऐकत संपत असे.

  • IMG_6842

 
गेल्या वर्षी आदिती शिकायला बाहेर पडली व अनुष्काही ८ते ५ पूर्ण वेळ शाळेत जायला लागली . अगदी empty nest नाही पण अचानक माझ्या आयुष्यात एक पोकळी निर्माण झाली. वर्षानुवर्षे जे मी करत होते ते आता मला करावे लागत नव्हते , त्यांच्या खाण्याची आता चिंता करायची नव्हती. त्यांचा रोजचा किलबीलाट आजूबाजूला नव्हता . एकटीनेच दूर रहात असल्याने छोटेछोटे निर्णय आदिती स्वत:च घेऊ लागली होती.
हे सगळंच माझ्यासाठी नविन होतं. एकप्रकारचं रितेपण आलं होतं. आपण करण्यासारखं काहीच नाही असं वाटू लागलं. अति काळजी किंवा भलत्या शंकांनी मन दाटून जाई. फोनची वाट बघायची सवय लागली , घर रिकामं वाटू लागलं. खूप कठिण गेलं ते वर्ष. अनू घरी यायची मी वाट बघत बसे.
मग या सगळ्याविषयी मी खूप वाचलं व यातून बाहेर पडणे सोपे आहे हे लक्षात आलं. हहळुहळू स्वत:ला एक्स्ट्रा ग्रूप क्लासेस मध्ये बिझी केले. नविन मैत्रीणी जोडल्या. माझ्या या ब्लॉगच्या रीसर्च मध्ये वेळ घालवू लागले.यथावकाश मी यातून बाहेर पडले .
आज अचानक ते सगळे आठवले व त्याचबद्दल लिहायचे ठरवले.
माझ्या वाचनात आलेले हे काही ऊपाय
1. छंद जोपासा,
2. एखाद्या सामाजिक कामात स्वत:ला गुंतवून घ्या ,
3. नवनविन ओळखी करा व वाढवा
4. या बद्दल एकटेच विचार न करता कोणाबरोबर तरी हे बोला व सल्ला घ्या .
5. आपल्या जोडीदाराबरोबर जास्त वेळ घालवा
6. Exercise व त्यातील feel good hormones मुळेdepression तर दूर होतेच व नवनविन fitness goals तूम्हाला एक नविन चैतन्य देतात.
7. याचा मनोमन स्विकार करा .
मैत्रीणीनो तूम्ही असे काही अनूभवले आहे का? तूम्ही त्यातून कशा बाहेर पडलात ?

ज्यांची पिल्लं अजून लहान आहेत त्यांच्यासाठी खास सल्ला … कधीकधी खूप दमायला होत असेल , कटकट होत असेल पण माहीत आहे का? नंतर त्याच गोष्टीसाठी मन तरसेल . खरच .. मूलांबरोबर आत्ता हातात जे क्षण आहेत ना ते जीवापाड जपून ठेवा व त्याचा भरभरून आनंद घ्या मात्र या दिवसाकरीताही मनाची तयारी करा!!

माझ्या लग्नानंतर मी प्रथमच दिवसाची सुरवात नाचणीची पेज किंवा आंबिल घेऊन होताना पहात होते, ( हा एक गोव्यातील पदार्थ आहे .. माझ्या सासूबाई तिथल्या असल्याने हा पदार्थ आमच्याकडे होत असे व शिवाय त्याही आहारातबाबत फारच माहीतगार असल्याने त्या सहाजिकच रोजच्या आहारात त्याचा वापर करत असत ).बरेच तास आंबवल्याने त्याची पौष्टीकता तर वाढतेच शिवाय एक विशिष्ठ स्वादही येतो. मलाही सुरवातीला ती चव जरा आवडत नसे मात्र रोज प्यायल्याने ते आंबिल आवडायला लागले .
नंतर मात्र फ़िट्नेस व नूट्रिशन शिकताना त्याचे फायदे लक्षात आले व आमच्या रोजच्या नाश्त्याचा एक अविभाज्य घटक होऊन गेले.

नाचणी हा एक अतिशय स्वस्त कार्बोहाइड्रेट व प्रोटीन स्रोत आहे. मात्र पौष्टीकतेच्या द्रृष्टीने फारच लाभदायी आहे. नाचणी हे अनेक फायदे होतात…
कैल्शीयम – हे मोठ्या मात्रेत असल्याने अर्थातच हाडे मजबूत होतात .
आयर्न – रक्तातील हीमग्लोबिन चे प्रमान सूधारते व अनिमिया होत नाही.
फॉसफोरस व पोटँशियम -ही शरीरातील लिक्विड बँलन्स सांभालतात.
नाचणीतील अँटी ऑक्सिडंट ने वार्धक्य दूर रहाते.
त्यातील पॉलीफ़ेनोल्स नी रक्तातील शर्करेची मात्रा व्यवस्थित रहाते.
ट्राइग्लिसरायड कमी करते तसेच LDL कलेस्टरॉल कमी करते.
आता हे सर्व फायदे पहाता नाचणी ची पौष्टीकता तुमच्या लक्षात आली असेलच . रोजच्या आहारात पेज, भाकरी, नाचणीचे थालीपिठ अशा अनेक प्रकारे नाचणी सेवन करता येईल. अगदी तान्ह्या बालापासून वयोवृद्ध अशा सर्वांसाठी आहारात नाचणीचा नियमीत वापर अत्यंत गरजेचा आहे.IMG_6828

काय आश्चर्य वाटले का? रोज़च्या हालचाली या व्यायामप्रकार असतील हे वाटले नव्हते ना? पण हा एक अतिशय महत्वाचा व उपयुक्त व्यायामप्रकार आहे .
या मध्ये आपल्या स्नायूंच्या हालचाली एकत्रितपणे मणक्याची स्थिरता सांभालत करावयाचे प्रशिक्षण दिले जाते.अनेक कोनात व दिशेने हालचाली करत असताना अनेक स्नायूगटांची मदत घेतली जाते.सहाजिकच अनेक स्नायूगटांचे शक्तिवर्धन होऊन उष्मांकक्षय (calorie Burning) होण्याच्या प्रक्रीयेस चालना मिलते.
आपल्याला रोजच्या धकाधकीत कधीकधी चुकीच्या हालचालींनी दुखापत ह्वायची शक्यता असते. काही स्नायूंची शक्ती व लवचिकता कमी असल्याने अशा हालचाली चूकीच्या होवून दूखापत होते व आपल्या रोजच्या आयुष्यात ते त्रासदायकही ठरते. हे व्यायाम प्रकार नियमित करून स्नायूंना हालचाली योग्य प्रकारे व सुरक्षिततेने करायची सवय लागते.
एक रोजचे उदाहरन घेऊया , कधीकधी तूम्ही जमिनीवरचा जड डबा कंबरेत वाकत उचलता व उंचावर ठेवायला जाता तेव्हा कंबर ,पाठ यात उसन भरते किंवा सांधे दुखतात.

IMG_6808
यासाठी असाच एक सोपा व्यायाम Functional Training मध्ये करता येतो.. Squat करून वजन उचलने  व overhead press .रोजचीच क्रिया आपल्या स्नायूंनी वारंवार शास्त्रोक्त पध्दतीने केल्याने स्नायू तत्पर व बलकट बनतात व मग तीच क्रिया सहजतेने व दूखापत न होता करता येते.
जेव्हा अनेक स्नायूगट एकत्रितरित्या काम करतात व मणक्याचे व त्याचबरोबर शरीराचेही संतूलन राखायलाही मदत करतात तेव्हा अर्थातच दूखापतीही कमी होतात .
महत्वाचा फायदा असाही होतो की व्यायामाने स्नायू बलकट होतात तसेच बांधाही छान होतो.
उतारवयातील दूखापती व त्या अनूषंगाचे त्रास वाचवायचा हा एक उत्तम उपाय आहे.
रोजच्या हालचालींचे व्यायामप्रकार किती उपयोगी आहेत हे आपल्या लक्षात आलेच असेल.