Exeryogi's blog
All about 30s to 50s
Recent Comments
Subscribe via Email

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

रिकाम्या घरट्याची व्यथा….
Empty Nest Syndrome म्हणजे शिकण्या करीता मूलं घर सोडून बाहेर पडतात तेव्हा होते ती भावनिक उलाघाल !
माझ्या आयुष्यात अचानक ही उलथापालथ झाली . हे असं होतं हे ऐकलं व वाचलं होतं मात्र खरच हे झालं तेव्हा मी या सगळ्याला मानसिकरित्या अजिबात तयार नव्हते.
आत्तापर्यंत मी दोन्ही मुलींचे रूटीन बघूनच माझे फीटनेस चे क्लासेस करत होते. माझा अख्खा दिवस त्यांच्याबरोबर शाळा व क्लास ना जात , त्यांच्यासाठी न्यूट्रीशस डबा , नाष्ता व जेवण करत , शाळेनंतरच्या गप्पा ऐकत ऐकत संपत असे.

  • IMG_6842

 
गेल्या वर्षी आदिती शिकायला बाहेर पडली व अनुष्काही ८ते ५ पूर्ण वेळ शाळेत जायला लागली . अगदी empty nest नाही पण अचानक माझ्या आयुष्यात एक पोकळी निर्माण झाली. वर्षानुवर्षे जे मी करत होते ते आता मला करावे लागत नव्हते , त्यांच्या खाण्याची आता चिंता करायची नव्हती. त्यांचा रोजचा किलबीलाट आजूबाजूला नव्हता . एकटीनेच दूर रहात असल्याने छोटेछोटे निर्णय आदिती स्वत:च घेऊ लागली होती.
हे सगळंच माझ्यासाठी नविन होतं. एकप्रकारचं रितेपण आलं होतं. आपण करण्यासारखं काहीच नाही असं वाटू लागलं. अति काळजी किंवा भलत्या शंकांनी मन दाटून जाई. फोनची वाट बघायची सवय लागली , घर रिकामं वाटू लागलं. खूप कठिण गेलं ते वर्ष. अनू घरी यायची मी वाट बघत बसे.
मग या सगळ्याविषयी मी खूप वाचलं व यातून बाहेर पडणे सोपे आहे हे लक्षात आलं. हहळुहळू स्वत:ला एक्स्ट्रा ग्रूप क्लासेस मध्ये बिझी केले. नविन मैत्रीणी जोडल्या. माझ्या या ब्लॉगच्या रीसर्च मध्ये वेळ घालवू लागले.यथावकाश मी यातून बाहेर पडले .
आज अचानक ते सगळे आठवले व त्याचबद्दल लिहायचे ठरवले.
माझ्या वाचनात आलेले हे काही ऊपाय
1. छंद जोपासा,
2. एखाद्या सामाजिक कामात स्वत:ला गुंतवून घ्या ,
3. नवनविन ओळखी करा व वाढवा
4. या बद्दल एकटेच विचार न करता कोणाबरोबर तरी हे बोला व सल्ला घ्या .
5. आपल्या जोडीदाराबरोबर जास्त वेळ घालवा
6. Exercise व त्यातील feel good hormones मुळेdepression तर दूर होतेच व नवनविन fitness goals तूम्हाला एक नविन चैतन्य देतात.
7. याचा मनोमन स्विकार करा .
मैत्रीणीनो तूम्ही असे काही अनूभवले आहे का? तूम्ही त्यातून कशा बाहेर पडलात ?

ज्यांची पिल्लं अजून लहान आहेत त्यांच्यासाठी खास सल्ला … कधीकधी खूप दमायला होत असेल , कटकट होत असेल पण माहीत आहे का? नंतर त्याच गोष्टीसाठी मन तरसेल . खरच .. मूलांबरोबर आत्ता हातात जे क्षण आहेत ना ते जीवापाड जपून ठेवा व त्याचा भरभरून आनंद घ्या मात्र या दिवसाकरीताही मनाची तयारी करा!!

Please Leave a Reply