Exeryogi's blog
All about 30s to 50s
Recent Comments
Subscribe via Email

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

कालिक वय म्हणजे अर्थातच तुमचे जन्मापासूनचे वय पण तुमच्या शरीराचे व अवयवांचे वय किंवा त्यांची स्थिती म्हणजे तुमचे जैविक वय.
हे त्या कालिक वयाच्या मापदंडानूसार असावे पण आपल्या दिनचर्येने व राहणीमानाने त्यात फार मोठी तफावतही येते.म्हणजे जर तुमची दिनचर्या तणावपूर्ण असेल , योग्य आहार व व्यायाम तुम्ही करत नसाल ,पूर्ण झोप घेत नसाल किंवा काही व्यसन असेल तर या सर्व गोष्टींचा विपरीत परिणाम नक्की शरीरावर दिसायला लागतो .अकालीच वृध्दापकाळाची चिन्हे दिसायला लागतात . अवयवांची व शरीराची अवस्था कालिक वयाच्या मापदंडांवर जास्त दिसायला लागते . चेहरा , बांधा, शरीराची स्थिती यावरूनही तूम्ही वयापेक्षा मोठे असता व दिसायलाही लागता. उदाहरणच द्यायचं झालं तर जरी तुम्ही कालिक वयाने ४५ वर्षांचे असाल तरीही तुमचे जैविक वय ५०ते ६० वर्ष असू शकते.
शरीराचे वय जेव्हा असे जास्त दिसते व तुमचे शरीरही वेगवेगळ्या व्याधींनी अकालीच पोखरलेले दिसते तेव्हा नक्कीच एक धोक्याची घंटा वाजली पाहीजे.
अनेक Body Analysers किंवा Biological Age tests नी आपल्याला आपले जैविक वय हे कालिक वयापेक्षा कमी किंवा निदान तेवढेच आहे का ते तपासता येते.
ते तसे येण्याकरता नियमित व्यायाम, योग्य आहार, पूरेशी झोप व सकारात्मक वृत्ति हीच गुरूकिल्ली आहे. वाढदिवस साजरा करताना जरा जैविक वयाकडेही नक्की लक्ष ठेवा.

IMG_6873

Please Leave a Reply